Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याभोंग्यावरून पोलीस आयुक्त आक्रमक; डेसिबल मोजण्याचे दिले आदेश

भोंग्यावरून पोलीस आयुक्त आक्रमक; डेसिबल मोजण्याचे दिले आदेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey)भोंग्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून आता भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश त्यांनी काढल्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत…

- Advertisement -

पोलीस आयुक्त पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबील मोजले जाणार आहेत. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम यावर काम करणार असून यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग (Special Training) देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि पोलीस अधिकारी (Police Officers) धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबल एकत्रित मोजणार आहेत. तसेच नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश प्रदूषण मंडळाला देण्यात आले आहेत.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक मशीद,मंदिर,गुरुद्वार,चर्च व ईतर धार्मिक स्थळांना भोंगे,ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्याचा वापर करावा सदर आदेश ३ मे २०२२ पासून अंमलात येईल असे परिपत्रक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी नुकतेच जारी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे १८ जुलै २००५ चे ध्वनीक्षेपक संबंधी निर्णयाच्या अनुषंगाने मशिदीवरील भोंग्यामधून उच्च स्वरात घोषणांमुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याकरिता ईशारा दिला आहे.त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सदर अध्यादेश काढला आहे.

या अध्यादेशात असे नमूद केले आहे कि,मनसेला मशिदी समोर हनुमान चालीसा पठणाचा अधिकार नसून फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सदर प्रयत्न असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मशिदींच्या १०० मिटर परिसरात ध्वनी क्षेपकाद्वारे अजनच्या पाचही वेळी १५ मिनिट आधी व नंतर हनुमान चालीसा किंवा कुठल्याही प्रकारचे भजन,गाणे किंवा ईतर भोंगे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कुणालाही भोंगे वाजवण्यास परवानगी हवी असेल त्यांना ३ मे पर्यंत मुभा देण्यात आली आहे.सदर आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये ४ महिने ते १ वर्षे शिक्षेची तरतूद असून विशेष परिस्थिती मध्ये ६ महिन्यापर्यंत तडीपारीची कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

ध्वनी क्षेपकासाठी आवाज मर्यादा अशी असेल

औद्योगिक क्षेत्र रात्री ७० डेसिबल व दिवसा ७५ डेसिबल

व्यावसायिक क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र रात्री ५५ डेसिबल,दिवसा ६५ डेसिबल

निवासी क्षेत्र रात्री ४५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल

शांतता परिक्षेत्रात रात्री ४० डेसिबल व दिवसा ५० डेसिबल

- Advertisment -

ताज्या बातम्या