Friday, May 3, 2024
Homeनगरकोट्यवधींची टोलवसुली, आग लागणारी वाहने मात्र वार्‍यावर

कोट्यवधींची टोलवसुली, आग लागणारी वाहने मात्र वार्‍यावर

घारगाव |वार्ताहर| Ghargav

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्यांवर दररोज कोट्यवधींची टोलवसुली केली जात आहे. मात्र महामार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता, आग लागणार्‍या वाहनांसाठी अग्निशमन यंत्रणाच नसल्याने अपघातग्रस्तांना वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसात वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत आहे. चंदनापुरी घाटात 23 फेब्रवारी 2022 मध्ये पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. तर खंदरमाळवाडी गावच्या हद्दीत रविवारी 17 एप्रिल 2022 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू ट्रकला अचानक आग लागली.

यामध्ये कोणतीही जिवतहानी हानी झाली नाही. मात्र ट्रक जळून खाक झाला. महामार्गावर असे अपघात घडल्यानंतर प्रचंड वाहतूककोंडी होते. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी 10-12 तासांचा कालावधी जातो. अशावेळी माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर परिणाम होऊन त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशानाही या वाहतूककोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.

या महामार्गावरून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणार्‍या टँकरची संख्याही लक्षणीय आहे. अशा टँकरांना अपघात होऊन आग लागण्याची घटना घडल्यास आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय महामार्गा अथोरिटीची स्वतःची सक्षम यंत्रणा हिवरगाव टोलनाक्यावर अस्तित्वात नाही. इतकेच काय तर पर्यायी व्यवस्थासुद्धा अथोरिटीकडे नाही. विशेष म्हणजे अशा काही घटना घडल्यास संगमनेर नगरपालिका, साखर कारखाना येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते. दररोज कोट्यवधींचा टोल वसूल करणारी टोल कंपनी आग विझवण्यासाठी स्वतःची सक्षम यंत्रणा कधी उभी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना आग लागल्यास आमच्याकडे स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा अद्याप तरी नाही. आमच्याकडे छोटे सिलेंडर असून गरज पडल्यास त्याचा वापर करतो. मोठी घटना असेल तर संगमनेर नगरपालिका, साखर कारखाना येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते.

– मोहम्मद रफिक, टोल व्यवस्थापक हिवरगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या