Friday, May 3, 2024
Homeनगरमहांकाळवाडगाव सोसायटीवर विखे गटाची सत्ता

महांकाळवाडगाव सोसायटीवर विखे गटाची सत्ता

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी महांकाळवाडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये विखे पाटील गटाला 8 जागा, ससाणे गटाला 3 जागा, तर मुरकुटे आदिक गटाला 2 जागा मिळाल्या.

- Advertisement -

विखे पाटील गटाचे नेतृत्व विठ्ठल सोमवंशी व शेषराव वानखेडे यांनी केले. या निवडणुकीमध्ये विखे गटाकडून भाऊसाहेब चोरमल, मुरलीअप्पा दातीर, सुदाम खुरुद, लक्ष्मण दातीर, नंदु तोडमल, गोकुळ खुरूद, जमादार शेख, केशव बडाख, रवींद्र कुलकर्णी, सुनिल महांकाळे, सोमनाथ आव्हाड, रंगनाथ खुरूद, नजिर शेख, राहुल दातीर, कचरू महांकाळे, बाळकृष्ण भनगडे, प्रकाश जाधव, नानासाहेब वानखेडे, आसिफ बेग, नवनाथ दिघे, पोपट शेख, बाबासाहेब जाधव, अण्णासो जाधव आदीचे सहकार्य मिळाले.

विखे पा. गटाकडून निवडून आलेल्या संचालकांमध्ये मधुकर खुरुद, शिवाजी बडाख, भगवान जाधव, नुरमोहम्मद पठाण, प्रकाश दहिटे, रघुनाथ दातिर, अनिल महांकाळे, कावेरी रवींद्र कुलकर्णी आदीसह ससाणे गटाकडून भानुदास पवार, छबुराव पवार, रंजना विजय पवार, तर मुरकुटे आदिक गटाकडून श्रीकांत आव्हाड व पंढरीनाथ बडाख आदी संचालक निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून संदिप कोठुळे यांनी काम पाहिले तर त्यांना सचिव राजेंद्र पवार यांनी सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या