Monday, May 6, 2024
Homeनगररांजणगावदेवी येथे घरफोडी; पाठलाग करताना चोरट्याचा मोबाईल व दुचाकी मिळाली

रांजणगावदेवी येथे घरफोडी; पाठलाग करताना चोरट्याचा मोबाईल व दुचाकी मिळाली

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याचा पाठलाग करताना त्याचा मोबाईल खाली पडला हा मोबाईल व त्याची दुचाकी मिळून आली.

- Advertisement -

याबाबत कैलास तुकाराम पवार (वय 55 ) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 16 मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे घरासमोर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरातील पेटीतून 500 रुपये किंमतीच्या 40 नोटा व 100 रुपये किंमतीच्या 100 नोटा असे रोख रक्कम 30 हजार रुपये चोरुन नेली.

चोरट्याचा पाठलाग करत असताना त्याचा मोबाईल व मोटारसायकल फिर्यादीला मिळून आले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 406/2022 भारतीय दंड विधान कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. कोळपे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या