Monday, May 6, 2024
Homeनाशिकज्याच्यासोबत सात फेरे घेतले त्यानेच केला घात

ज्याच्यासोबत सात फेरे घेतले त्यानेच केला घात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सासरवाडीकडील नातेवाईकांच्या मारहाणीत सुनेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माडसांगवी येथे घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला….

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती विशाल कापसे (वय २४, रा.माळवाडी माडसांगवी, ता.जि.नाशिक ) हिला तिच्या सासरच्यांनी मागील भांडणाची कुरापत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्यानंतर तिचा पती विशाल याने त्याच्या घराजवळ पडलेल्या लोखंडी फावडा उचलून आरतीच्या डोक्यावर व तोंडावर मारून तिला गंभीर जखमी करून ठार केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे, विशाल राजाराम कापसे (सर्व रा.माळवाडी माडसांगवी ता.जि.नाशिक ) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी इरफान शेख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या