Friday, May 3, 2024
Homeनगरथेरगावला माझी वसुंधराची जोरदार तयारी

थेरगावला माझी वसुंधराची जोरदार तयारी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

थेरगाव ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा-2 या अभियानात सहभाग घेतला असून दोन दिवसात राज्यस्तरीय समिती गावाला भेट देणार आहे. यात कोणत्याही स्थितीत बक्षिस मिळवायचेचे असा चंग बांधत ग्रामस्थांची जोरदार तयारी सूरू आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी 78 हजार 230 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड, हेरिटेज ट्री, नगर-सोलापूर रोड ते थेरगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ व फुल झाडांची लागवड, 130 एलईडी पथदिवे, ग्रामपंचायत इमारतीवर सोलर पॅनल, सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी गावात ट्रॅक, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, प्लास्टिक बंदी, प्लास्टिक पिकअप डेचे आयोजन, पर्यावरण पूरक गणेशोत्सव व दुर्गोत्सव जनजागृती, बंधारे, जलस्त्रोत स्वच्छता मोहीम, सार्वजनिक विहिरींचा गाळ काढणे, गांडुळ खताचे कंपोस्टिंग प्लांट, वॉल पेंटिंगव्दारे जनजागृती, गावामध्ये एकूण 22 बायोगॅस प्रकल्प, नदी सुशोभिकरण, जिल्हा परिषद शाळेत एकूण 3 रेन वाटर हार्वेस्टिंग व सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वयीत, 4 हजार झाडांना ठिबक सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, सीसीटी व ओढा खोलीकरण, ग्रामपंचायत कार्यालय परिसर सुशोभीकरण करून ऑक्सिजन पार्क, वृक्षदिंडी, प्रभात फेरी, होडीग्ज, भिंतीवरील म्हणी याद्वारे जनजागृती, पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी क्रुत्रीम विसर्जन तलाव तयार करून पर्यावरणपूरक मूर्ती वाटप करून जनजागृती केलेली आहे. शासकीय कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौर ऊर्जा प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, सोलार कृषी पंप ग्रामपंचायतीने अशी अनेक नाविन्यपूर्ण कामे केली असून पुढील वर्षांमध्ये थेरगाव ग्रामपंचायत देशभरामध्ये अव्वल बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या