Tuesday, May 7, 2024
Homeनगरबेलवंडी गावात भीषण पाणी टंचाई

बेलवंडी गावात भीषण पाणी टंचाई

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बु या मोठी बाजारपेठ असलेले गावावर संध्या भीषण पाणी टंचाईचे संकट आले आहे. शासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव पाठवुनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रातस्थानी 7 जुन रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

बेलवंडी गावाला उन्हाळ्यात कायम पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. आज घडीस गावामधील सर्व उद्धभव कोरडे पडले आहेत. गावातील कुठल्याही शासकीय उद्धभवाला पाणी नसल्यामुळे गावास पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. शासकीय उद्धभवाशेजारील खाजगी विहिरी व बोअर ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सदर विहिरी व बोअर सुद्धा कोरडे पडले आहेत.

त्यामुळे गावातील नागरिक पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने 23 मे रोजी गावास टँकर द्वारे पाणी पुरवठा होण्यासाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे .परंतु प्रशासना कडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सर्व ग्रामस्थ 7 जून येथील रोजी भैरवनाथ मंदिर येथे उपोषण करणार आहेत अशी माहिती गावच्या सरपंच प्रा. डॉ. सुप्रिया पवार यांनी दिली आहे.

गावाला कायम शाश्वत पाणीपुरवठा व्हावा ह्या उद्देशाने सरपंच यांनी जल जीवन मिशन अंतर्गत विशेष पाठपुरावा व अथक प्रयत्न करून गावासाठी स्वतंत्र 24 कोटी रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. परंतु शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे अद्याप सदर योजना मंजूर होऊन सुद्धा काम सुरू झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या