Saturday, May 4, 2024
Homeनाशिक‘स्टाईस’ची निवडणूक जाहीर

‘स्टाईस’ची निवडणूक जाहीर

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या( STICE )संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ( Election )कार्यक्रम जाहीर झाला असून 17 जुलै रोजी मतदान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थांचे उपनिबंधक किरण गायकवाड काम पाहणार आहेत.

- Advertisement -

संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यात 7 संचालक हे कारखादानर गटातून, सोसायटी गटातून 1 संचालक, दोन महिला संचालक, अनूसुचीत जाती-जमाती गट, इतर मागास व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून प्रत्येकी एक संचालक यासाठी ही निवडणूक होणार आहे.

संस्थेचे 339 सभासद संस्थेवर कुणाचे नेतृत्व राहणार याचा फैसला करणार आहेत. इच्छुकांना निवडणूक कार्यालयात 9 जून ते 15 जून या दरम्यान, शासकीय व सार्वजनिक सुट्ट्या वगळता सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. 16 जून रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल.

वैध नामनिर्देशन पत्राची सूची 17 जूनला निवडणूक कार्यालय व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. 17 जून ते 1 जुलै सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. 4 जुलै रोजी उमेदवारांना निशाणीचे वाटप करुन उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित

करण्यात येईल.

17 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी नंतर घोषीत करतील. 17 जुलै रोजी मतदान संपल्यानंतर अर्धा तासाने मतमोजणी होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल घोषीत करण्यात येणार आहे.

निवडणूक चुरशीची?

संस्थेचे माजी सरव्यवस्थापक व माजी संचालक नामकर्ण आवारे, प्रशासकीय मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये ही निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. आवारे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची तर माळोदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागणार आहे. माजी व्हाईस चेअरमन किशोर देशमुख यांनी तिसरे पॅनल उभे करण्याची घोषणा यापूर्वीच केली असून भाजपाचे त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता आहे. त्यामूळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या