Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामीण भागात ‘माती वाचवा’चीच चर्चा

ग्रामीण भागात ‘माती वाचवा’चीच चर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चल रे शिरप्या, चल रे गणप्या, चल गं मावशे, चाल रे भाऊ,

- Advertisement -

ए ताई, ए दादा चला नाशिकला चला!

करूया संकल्प माती वाचवण्याचा

सद्गुरूंना (जग्गी वासुदेव) साथ देण्याचा..

अशा आशयाची एकच चर्चा जिल्हाभर, गावोगावी, पारावर, कट्ट्यावर, चावडीवर आणि गल्ली-गल्लीत सुरू आहे. गावागावांतील शेतकर्‍यांची या कार्यक्रमाला येण्याच्या तयारीची लगबग दोन दिवसांपासून सुरू आहे.

श्री. सद्गुरूंच्या ( Shri Sadguru )यांच्या ‘माती वाचवा’ ( Save Soil )कार्यक्रमाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती जेव्हा शेतकर्‍यांना मिळाली तेव्हाच शेतकर्‍यांनी या कार्यक्रमाला येण्याचा निश्चय पक्का केला आहे. कारण माती हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जमीन आणि माती भविष्यात किती महत्त्वाची राहणार आहे यावर शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत अशा सर्वांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

भविष्यात रासायनिक शेती ही किती आतबट्ट्याची होणार आहे, त्यातून मानवी आरोग्य कसे बिघडणार आहे, याबद्दलही शेतकरी चर्चा करत आहेत. रासायनिक खतांचा वापर आपल्या शेतामध्ये कमी करून अधिकाधिक सेंद्रीय शेती कशी करावी? जमिनीचा पोत कसा घसरत चाललाय? क्षारयुक्त जमिनीचे तोटे काय आहेत? विषमुक्त शेतीचे फायदे कोणते? याचे मार्गदर्शन मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिव्हाळ्याचा विषय आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जमीन आणि माती भविष्यात किती महत्त्वाची राहणार आहे यावर शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत अशा सर्वांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. भविष्यात रासायनिक शेती ही किती आतबट्ट्याची होणार आहे, त्यातून मानवी आरोग्य कसे बिघडणार आहे, याबद्दलही शेतकरी चर्चा करत आहेत. रासायनिक खतांचा वापर आपल्या शेतामध्ये कमी करून अधिकाधिक सेंद्रीय शेती कशी करावी? जमिनीचा पोत कसा घसरत चाललाय? क्षारयुक्त जमिनीचे तोटे काय आहेत? विषमुक्त शेतीचे फायदे कोणते? याचे मार्गदर्शन मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या