Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : 'त्या' दोघांकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : ‘त्या’ दोघांकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची कबुली

मुंबई । Mumbai

पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मुसेवाला (Sidhu MooseWala) हत्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संतोष जाधव (Santosh Jadhav) आणि सौरभ महाकाल कांबळे (Saurabh Mahakal Kamble) यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi Gang) संबंध असल्याची कबुली दिली आहे…

- Advertisement -

तसेच संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी त्याच्या नवनाथ सूर्यवंशी (Navnath Suryavanshi) नावाच्या एका साथीदाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या (shoot) झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आली. त्या प्रकरणी मंचर येथून सौरभ महाकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर संतोष जाधव गुजरातमध्ये (Gujarat) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलीसांनी (Pune Police) सापळा रचत गुजरातमधील भुज जिल्ह्यातील (Bhuj district) मांडवी गावातून (Mandvi village) संतोषचा मित्र नवनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी त्यांचे कौशल्य वापरल्यावर त्याने संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात (Nagor village) लपवले असल्याचे सांगितले.

दरम्यान, यावेळी संतोष जाधवने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी टक्कल केले होते. त्याचबरोबर त्याने त्याचा पेहराव देखील बदलला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांनी मोठ्या शिताफीने संतोष जाधवला अटक (Arrested) केल्यानंतर त्याची व सौरभ महाकाल कांबळे यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची कबुली दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या