Friday, May 3, 2024
Homeनाशिकसंस्कार व विचार माणसाला घडवतात: डॉ. रसाळ

संस्कार व विचार माणसाला घडवतात: डॉ. रसाळ

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

आजवर सिन्नर महाविद्यालयाने (Sinnar College) अनेक विद्यार्थी (students) घडवले आहेत. डॉक्टर (doctor) , इंजिनियर (Engineer), अधिकारी, सैनिक (Soldier), पोलीस (police), गुरुवर्य यांचा वारसा या महाविद्यालयाला लाभला आहे. महाविद्यालयानेही त्यांच्यावर संस्कार केलेले असतात. माणसाचे संस्कार, आचार, विचार माणसाला घडवत असल्याचे प्रतिपादन डॉ. पी. व्ही. रसाळ (Dr. P. V. Rasal) यांनी केले.

- Advertisement -

येथील सिन्नर महाविद्यालयात माजी विद्यार्थी लेफ्टनंट अनिकेत चव्हाणके (Former student Lieutenant Aniket Chavanke) यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र संचालक हेमंत वाजे (MVP Director Hemant Waje) होते. कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. महाविद्यालयातून अनिकेत सारखेच उच्चपदस्थ अधिकारी घडतील अशी अपेक्षा रसाळ यांनी यावेळी व्यक्त केली. चव्हाणके कुटुंब आणि सिन्नर हे एक अतूट नाते आहे.

त्यांना राजकीय (political), सामाजिक (social) वारसा लाभलेला आहे. एवढ्या कमी वयात लेफ्टनंट (Lieutenant) होणे साधी गोष्ट नाही. हा सिन्नर तालुक्याचा (sinnar taluka) गौरव असल्याचे मविप्रचे माजी संचालक राजेंद्र नवले (Rajendra Navale, former director of MVP) म्हणाले. आर्मीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिकेत यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षणाची चिकाटी किती महत्त्वाची आहे हे दिसून येते. महाविद्यालयातून असेच अधिकारी घडावेत अशी अपेक्षा अण्णासाहेब गडाख यांनी व्यक्त केली. अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, विद्यार्थी घडतो. लेफ्टनंट अनिकेत यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचे आवाहन हेमंत वाजे यांनी केले.

यावेळी शालेय समिती सदस्य मधुकर मवाळ, मंगेश चव्हाणके, उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, प्रा. आर. व्ही. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. सोनवणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सी. जे. बर्वे यांनी अनिकेत यांचा परिचय करुन दिला. प्रा. जी. पी. चिने यांनी आभार मानले. सूत्रसंचलन प्रा. एस. व्ही. कचरे यांनी केले.

उद्दिष्ट ठेवून परिश्रम घ्या: चव्हाणके

लेफ्टनंट अनिकेत यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्मी, एन. डी. ए., एमपीएससी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मागे न राहता मेहनत घेणे गरजेचे आहे. डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून परिश्रम घेतल्यास यश नक्की मिळते. सकारात्मक विचार करीत ध्येय प्राप्तीसाठी जिद्दीने पुढे गेल्यास यश आपल्याबरोबर असते असे प्रतिपादन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या