Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी सेनेकडून व्हीप जारी; काय होणार बंडखोरांचे

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी सेनेकडून व्हीप जारी; काय होणार बंडखोरांचे

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi government) कोसळून नवे सरकार आले आहे. त्यानंतर विधीमंडळात नवीन बदल होत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने ते लवकरच भरले जाणार आहे. यासाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहेत…

- Advertisement -

भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर (MLA Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे मुख्य प्रतोद (Chief Protagonist) सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा व्हीप देखील लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे (Rebel MLA) पेच वाढण्याची शक्यता आहे.

तसेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप (bjp) उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणे शिंदे गटासाठी (shinde group) अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करते हे उघडपणे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, यावेळी साळवी म्हणाले की, महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी (Legislative Assembly Speaker) मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की, महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. तसेच शिवसेनेने व्हिप बजावला असून बंडखोर आमदारांनी जर मला मतदान (voting) केले नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,असा इशारा आमदार व महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या