Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'या' आमदारांनी केले नाही मतदान

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘या’ आमदारांनी केले नाही मतदान

मुंबई | Mumbai

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) पार पडली. या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मविआचे (Mahavikas Aghadi) उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) रिंगणात होते….

- Advertisement -

सभागृहात ‘तो’ मेसेज वाचत भुजबळांचा अमित शाहांना टोला

निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना 164 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली. गेल्या वर्षी काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.

नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

‘या’ आमदारांनी केले नाही मतदान

  • राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांनी मतदान केले नाही.

  • शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने एक पद रिक्त आहे.

  • राष्ट्रवादीचे निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे, नरहरी झिरवाळ.

  • भाजपचे मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप.

  • एमआयएमचे मुफ्ती इस्माईल.

  • काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, जितेन अंतापूरकर.

  • समाजवादी पक्षाचे अबू आझमी, रईस शेख आणि एमआयएमचे शाह फारुख अनवर हे तठस्थ राहिले.

शिवसेनेकडून ३९ आमदारांविरोधात तक्रार, शिंदे गटानेही दिले पत्र; ‘वाचा’ काय घडलं विधानसभेत?

- Advertisment -

ताज्या बातम्या