Friday, May 3, 2024
Homeनगरस्लॉटर हाऊसला यावर्षी परवानगी नाही- आयुक्त गोरे

स्लॉटर हाऊसला यावर्षी परवानगी नाही- आयुक्त गोरे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात दरवर्षी मनपाकडून तात्पुरते स्लॉटरहाऊस (कत्तलखाना) व इतर उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र, यंदा मनपाकडून शहरात कुठेही तात्पुरत्या परवानगी दिल्या जाणार नाहीत, असे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाकडून तसे आदेश असल्याचेही गोरे यांनी सांगितले.

- Advertisement -

येत्या रविवारी मुस्लिम समाज बांधवांकडून शहरात बकरी ईद साजरी होणार आहे. या दिवशी कुर्बानी दिली जाते. त्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून मुकुंदनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात स्लॉटरहाऊसला परवानगी दिली जाते. तसेच इतर उपाययोजनाही केल्या जातात. यावर्षी मात्र, अशा कोणत्याही उपाययोजना व तात्पुरत्या परवानग्या मनपाकडून दिल्या जाणार नाहीत. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत.

जेथे अधिकृत कत्तलखाने सुरू आहेत, अशा ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. राज्य शासनानेही यासंदर्भात गाईडलाईन दिलेल्या आहेत. नगर शहरात एकही अधिकृत कत्तलखाना नसल्याने बकरी ईदच्या दिवशी मनपाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जाणार नाहीत, असे आयुक्त गोरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या