Friday, May 3, 2024
Homeनाशिकसुरगाण्यात धुव्वाधार, नद्या-नाले तुडुंब; पाहा व्हिडीओ

सुरगाण्यात धुव्वाधार, नद्या-नाले तुडुंब; पाहा व्हिडीओ

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

शहरासह परिसरात तीन ते चार दिवसांपासून दिवसरात्र पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे (Rain) अनेक सखल भागात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे…

- Advertisement -

नदी, नाले दुथडी वाहत असताना नार नदीला (Naar River) तसेच खडकमाळच्या ओहोळाला पूर आला आहे. पाऊस (Rain) सुरूच असल्याने भात लावणीस विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

बरसो रे मेघा मेघा…! नाशकात पावसाची संततधार

पावसामुळे (Rain) घराबाहेरील दैनंदिन कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. पावसाचे पाणी शेतीत साचल्याने शेतीकामांना अडथळा येत आहे. चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतरच भात लावणी व शेतीची इतर कामे करता येणार असल्याने बळीराजाने सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या