Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात संततधार! तीन दिवसात गंगापूर धरणातील जलसाठ्यात 'इतकी' वाढ

जिल्ह्यात संततधार! तीन दिवसात गंगापूर धरणातील जलसाठ्यात ‘इतकी’ वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या (Dam) जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे…

- Advertisement -

इगतपुरीसह (Igatpuri) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यात पाऊस (Rain) बरसत असून यामुळे गंगापूर पाणलोट क्षेत्रातून (Gangapur catchment area) मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) जलसाठा 45 टक्क्यांवर पोहोचले आहे.

तीन दिवसात गंगापूर धरणातील जलसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दि. ०७ जुलैला २६ टक्के इतका जलसाठा असलेले गंगापूर धरण संततधारेने आज दि. १० रोजी ४५ टक्के भरले आहे.

Video : दिंडोरीत पावसाचा जोर वाढला; पालखेड धरणातून ६९२० क्युसेस पाण्याचा विसर्ग

तसेच पालखेड धरण (Palkhed Dam) ४८ टक्के भरले असून धरणातून कादवा नदीत (Kadwa River) पात्रात ६ हजार ९२० क्युसेस पाण्याचा विसंर्ग (Water Discharged) सोडण्यात आला आहे. कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दारणा धरणातील (Darna Dam) जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या दारणा धरणात 60 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय नांदूरमध्यमेश्वर धरणातूनदेखील पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या