Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यालसीकरणात भारताचा नवा विक्रम

लसीकरणात भारताचा नवा विक्रम

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

भारताने करोना ( Corona )संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेत ( Corona Vaccination Campaign) आणखी एक नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

- Advertisement -

देशाने लसीकरणाचा 200 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. त्याबद्दल जगभरातून भारताचे कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization)भारताचे खास अभिनंदन केले आहे.

करोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधक लस हा एकमेव उपाय आहे आणि भारताने ते सप्रमाण सिद्ध केले आहे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या