Friday, May 3, 2024
Homeनगरपवळा हिवरगावकर यांच्या नावे तमाशा कलावंतांना सांस्कृतिक पुरस्कार

पवळा हिवरगावकर यांच्या नावे तमाशा कलावंतांना सांस्कृतिक पुरस्कार

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या कलावंताना पुरस्कार पुण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील तमाशा क्षेत्रात विशेष व भरीव योगदान देणार्‍या कलावंताला संगमनेर तालुक्यातील पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने राज्य सरकारने सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा केली आहे. तमाशा क्षेत्रातील रंगमंचावर काम करणारी पहिली स्त्री म्हणून पवळा यांचा सन्मान करण्यात येतो. त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केल्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या कर्तुत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. तथापि त्यांच्या गावी कायमस्वरूपी स्मारक उभे राहावे यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक

सकाळच्या वतीने राज्यातील कलावंतांना कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ज्या कलाकारांनी किर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, लोककला इ. या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी केली असेल अशांना पुरस्कार देऊन विभागामार्फत सन्मान केला जातो. या विविध कलांमध्ये बहुमूल्य योगदान देणार्‍या कलाकारांचा यथोचित गौरव व्हावा म्हणून तसेच विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या लोककल्याणकारी योजनांचे महामहीम व्यक्तींच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणार्‍या सांस्कृतिक पुरस्कार व वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेस या शासनाने मंजूरी दिली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार वृध्द सांस्कृतिक व कलावंत मानधन योजनेला पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर पुरस्काराचे नाव देण्यात आले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणार्‍या कीर्तनकार यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत ह.भ.प. शिवराज उर्फ रामदास महाराज किर्तन/समाजप्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्या मानधन योजनेस राजश्री शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहेत.

..अखेर निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पुर्ण

संगमनेरकरांचा सन्मान

तमाशा कलावंतांना देण्यात येणार्‍या पुरस्काराचे नाव पवळा हिवरगावकर असे देण्यात आले आहे. त्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील मूळ रहिवासी आहे. भारतातील तमाशा सृष्टीत जेव्हा महिलांचे पात्रही पुरुष करत होते. महिला तमाशा सृष्टीत काम करत नव्हत्या. तेव्हा आद्य महिला कलावंत म्हणून पवळा यांना ओळखले जाते. तमाशा रंगमंचावर स्त्री म्हणून काम करणारी पवळा ही पहिली महिला ठरली आहे. पवळा यांचे समग्र आयुष्य हे अत्यंत संघर्षहय राहिले आहे. तमाशासृष्टी स्वतःचा फड निर्माण करण्याबरोबर न्यायालयीन प्रक्रियेलाही त्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र अखंड जीवनभर त्यांनी तमाशा कलावंत म्हणूनच सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने देण्यात येणार्‍या पुरस्कारामुळे तमाशा कलावंतांचा सन्मान होणार असला तरी यानिमित्ताने राज्य शासनाने पवळाच्या कार्यकर्तुत्वावर शिक्कामोर्तब केले आहेत.

अल्पवयीन मुलीचे अपहरण, धर्मांतर, निकाह करून अत्याचार

गरज आता स्मारकाची

संगमनेर तालुक्यातील हिरवागाव पावसा येथे पवळा यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी स्मारक उभे राहावे अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. त्यांच्या अत्यंत संघर्षमय असलेल्या जीवन कहाणी पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याची मागणी ही यापूर्वी करण्यात आली होती. नव्या पिढीला त्यांच्या तमाशा सृष्टीतील योगदानाची ओळख व्हावी या दृष्टीने पवळा यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात यावे यासाठी शासनाने आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टेम्पो-मोटारसायकल अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या