Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात घरगुती वीजबिले 70 हजार रूपये

पारनेर तालुक्यात घरगुती वीजबिले 70 हजार रूपये

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर शहरासह तालुक्याच्या अनेक गावांमधील घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने झटका दिला आहे. शेकडो ग्राहकांना महिन्याचे वीजबील 70 ते 80 हजार रुपये पाठविण्यात आली आहेत. ही बिले पाहून मोलमजुरी करणार्‍या ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या या पठाणी वसुलीविरोधात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला असून धडक मोर्चाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे यांनाही 76 हजार रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे. त्यांना दरमहा वापरानुसार 300 ते 500 रुपये घरगुती वीज वापराचे बील येते. हा आकडा पाहून आपणही चकीत झाल्याचे ते म्हणाले. यादरम्यान देवीभोयरे, निघोज, वडनेर बुद्रुक, पठारवाडी तसेच परिसरातून अशीच बिले आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांना विजेचे मिटर रिडींग घेणारी एजन्सी बदलली असून त्यांनी दोन वर्षांच्या वापराइतकी बिले पाठविली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संतप्त सरडे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत ही पठाणी वसुली थांबविण्याची मागणी केली. अद्यापही महावितरणकडून या बिलांबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

अधिकार्‍यांकडून हप्त्याने वसुली

एजन्सीच्या चुकीमुळे ग्राहकांना दोन वर्षांच्या वापराची बिले पाठविण्यात आली असून हा आकडा 70 हजार आहे. ग्राहकांना ते बिल तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्याची तयारी दर्शविली जात आहे. त्यानंतर हप्त्ो जमा करण्यासाठी दबाव आणला जातो. वीज जोड तोडला जाऊ नये म्हणून अनेक ग्राहकांनी हप्ते पाडून घेत 2 ते 3 हजार रुपयांचे हप्ते जमाही केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या