Friday, May 3, 2024
Homeनगरदेवठाण गटात शतप्रतिशत महिलाराज हा आनंदाचा क्षण- वाकचौरे

देवठाण गटात शतप्रतिशत महिलाराज हा आनंदाचा क्षण- वाकचौरे

वीरगाव |वार्ताहर| Virgav

आज अहमदनगर जिल्हा परिषदेचा देवठाण गट, देवठाण आणि गणोरे पंचायत समिती गणात तिनही ठिकाणी महिलांना संधी मिळणार असल्याने हा आनंदोत्सव साजरा करण्याचा क्षण असल्याची भावना जि. प. सदस्य आणि गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

देवठाण गट सर्वसाधारण महिला तर देवठाण आणि गणोरे गणात अनुसुचित जमाती महिलांना प्राधान्यक्रम मिळाला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या मुलनिवासींना प्राधान्य देऊन राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती केली. या देशाचे खरे मुलनिवासी आदिवासी बांधव असल्याने पहिल्यांदाच आदिवासी महिला सर्वोच्च स्थानी जाण्याची नोंद इतिहासात होईल.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही आमच्या देवठाण आणि गणोरे गणात मुलनिवासी आदिवासी महिलांना संधी मिळणार हे आरक्षण सोडतीत जाहीर झाले. देवठाण गटातही सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार असल्याने सन 2022 मध्ये राष्ट्रपती पदानंतर शतप्रतिशत महिलाराज अवतरणार ही महिलांनी आनंदोत्सव करण्यासारखी घटना आहे.

देवठाण गट आणि दोन्ही गणात महिलांचा वरचष्मा राहणार असल्याने आपल्याला अतीव आनंद झाला असल्याची भावना गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, महाराष्ट्राचे कर्तुत्ववान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रासहित अखंड हिंदुस्थान भाजपमय होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अकोले तालुक्यातील आगामी जि.प. आणि पं.स. निवडणूकीतही भाजपाची शतप्रतिशत विजयी वाटचाल दिसून येईल. देवठाण गट आणि दोन्ही गणातही कमळावर तिनही महिला लक्ष्मीच्या रुपात विराजमान झालेल्या दिसतील.

– जालिंदर वाकचौरे, गटनेते, जि. प. अ. नगर

- Advertisment -

ताज्या बातम्या