Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : ...तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले….

- Advertisement -

पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे यावर ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असे भुजबळ म्हणाले.

फडणवीस दिल्लीला; मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द

पाच तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का? अशी विचारणा झाली असता ते म्हणाले, याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) चालू आहे ती कशी सुटते ते बघू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर मंत्रिमंडळाचा काय तो निर्णय होईल. पण आता दोनच मंत्री कॅबिनेटमध्ये आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

उद्धव ठाकरे गटाला ‘सर्वोच्च’ धक्का; ‘ती’ मागणी फेटाळली

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत बरी नाही. रात्री 2 पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे त्याची परिसीमा आहे. थोडी विश्रांती घ्यावा लागते. दोनच मंत्री आहे आणि किती दौरे करणार?, असेही ते म्हणाले.

सत्तासंघर्षाबाबत पुढील सुनावणी ८ ऑगस्टला; काय घडले आज कोर्टात?

प्रभागरचनेबाबत भुजबळ म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना (Ward Structure) का बदलले हे सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच.

Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ

राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठीया कमिशनमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात आहे, अनेक त्रुटी आहेत त्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या