Friday, May 3, 2024
Homeनगरस्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना आणि माजी सैनिक संघटना लढणार

स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना आणि माजी सैनिक संघटना लढणार

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील साखर सम्राटांना इतर राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार देऊन जनतेला एक उत्तम पर्याय देण्यासाठी स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना आणि माजी सैनिक संघटना एकत्रित निवडणूका लढणार असल्याचे स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

यावेळी स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. यावेळी घनवट म्हणाले, तालुक्याच्या राजकारणात नेहमीचेच चेहरे असून भ्रष्ट कारभारामुळे रस्ते पाणी, शिक्षण, आरोग्य विषया अनेक तक्रारी असून हे चित्र बदलायचे असेल तर निवडणुकीत प्रामाणिक उमेदवारांना निवडून देऊन कारभार करण्याची संधी पाहिजे. तालुक्याच्या राजकारणावर साखर कारखानदारीशी संबंधित घराण्यांच्या वरचष्मा राहिला आहे. समाजात चांगली सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांना डावलून यांच्याच कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देऊन पैश्याच्या जोरावर निवडूनही आणले जाते.

पैश्याच्या जोरावर निवडून आल्यामुळे, तसेच सामाजिक कामाचा अनुभव नसल्यामुळे सर्व कामात टक्केवारी मिळवणे, इतकाच या पदावर निवडून येण्याचा हेतू असतो. याचा बीमोड करण्यासाठी निवडणुकीत प्रामाणिक उमेदवारांना निवडून देऊन कारभार करण्याची संधी पाहिजे. शेतकरी आणि सैनिक एकत्र आल्यावर कोणत्याही बलाढ्य सक्तीचा पराभव होऊ शकतो. सर्व साखर सम्राटच्या कुटुंबियांना पराभूत करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणामध्ये उमेदवार देऊन तालुक्यातील जनतेला स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटना यांच्या मार्फत एक उत्तम पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सांगळे, नवनाथ खामकर, बाळासाहेब सातव, भाऊसाहेब पोखरकर, भाऊसाहेब शिंदे, बबन शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या