Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याTET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं?; सत्तार म्हणाले,...

TET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं?; सत्तार म्हणाले,…

मुंबई | Mumbai

आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणार असं थेट ठाकरेंना आव्हान देणारे राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण ठरलं टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा. याच प्रकरणामुळे सत्तारांचं नाव चर्चेत आलं आहे.

- Advertisement -

अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा या २०२० मध्ये टीईटी मध्ये अपात्र असल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी आरोपी सुपे याला पैसे दिले होते, असा आरोप आहे. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. हा बदनामीचा कट असल्याचा सत्तार यांनी केला आहे.

माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा दिली. पण त्या पात्र झाल्या नाहीत. आज अचानक २०२२ मध्ये यादी समोर आली. या चार वर्षांमध्ये कुठेही मुली पास झाल्या असतील आणि त्याचा फायदा घेतला असेल ते दाखवा. शिक्षण खात्यातील एक-एक कागदपत्र कोणीही माहितीच्या अधिकाराखील मागवून बघू शकतो. माझ्या संस्थेमध्ये माझ्यामुली २०१७ मध्ये नोकरीला लागल्या. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी परीक्षा आणि त्या अपात्र ठरल्या. त्यांची प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत. कुणाला हवी असतील तर त्याची कॉपीही देतो, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या