Friday, May 3, 2024
Homeनगरस्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात

स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

क्रांतीदिनानिमित्त मंगळवारी (दि.9) इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम जनआंदोलनाच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर नो बॅलेट, नो वोटींग विषयकाचे जनजागृतीवर जालिंदर चोभे यांनी पत्रकांचे वाटप केले. देशात मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी ईव्हीएम चले जावची घोषणा देण्यात आली.

- Advertisement -

चोभे म्हणाले, भाजपाई लबाडांच्या हाती केंद्रीय सत्ता आणि लोकशाही पायदळी तुडवीत अघोषित आणी-बाणी देशात निर्माण झाली आहे. बहुजनांना गुलाम करण्यासाठी जाती, धर्माच्या नावाखाली लढवले जात आहे. सत्ताधार्‍यांनी देशाची आर्थिक स्थिती डामाडौल केली असून शिक्षण व्यवस्था मोडित काढली आहे. गुजराथ्यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई गुजरातला जोडण्यासाठी मोठे हत्याकांड घडवले. तरीही 1960 साली मुंबई महाराष्ट्रात राहिली.

याचा बदला घेण्यासाठी गुजराथी मोदी-शहांनी मुंबईचे अभेद्य कवच शिवसेना फोडून, सरकार पाडले. 2019 च्या निवडणुकीमध्ये 20 लाख ईव्हीएम चोरीसह अनेक घोटाळे उघड झाले. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर भरोसा ठेवून गप्प राहिलो. 2024 पर्यंत हातपाय बांधले जातील, कारण निवडणुकांचे नाटकांचे प्रयोग निवडणूक आयोग करीत आहे. सुप्रीम कोर्ट प्रेक्षकांच्या भूमिकेत असून स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात आहे.

तर 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर होण्यासाठी देशातील ग्रामपंचायतीन ईव्हीएम विरोधात ठराव करून जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाला पाठवून चेतावनी द्यावी. नो बॅलेट, नो वोटिंग असा ठराव पास केला तर ग्रामसभेच्या ठरावाला पार्लमेंटच्या ठरावा सारखेच अभेद्य कवच राहणार आहे. नो बॅलेट, नो वोटींग मोहिमेच्या जनजागृतीसाठी गोरख जाधव, अस्लम शेख, डॅनीयल तिजोरे, सुनील मिरपगार, सुनील कदम, दीपक भिंगारदिवे, महादेव काळे, विवेक पटेकर, सोमनाथ शिंदे, हरिदास खोरे प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या