Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामविआत नाराजीनाट्य कायम; शिवसेनेच्या 'त्या' निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

मविआत नाराजीनाट्य कायम; शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे….

- Advertisement -

शिवसेनेने (Shivsena) इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यावरून काँग्रेसने (Congress) शिवसेनेवर टीका केली, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) शिवसेनेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे….

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही जर मित्र आहोत तर एकमेकांशी बोलले पाहिजे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाराजी व्यक्त केली.

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर अधिक चांगले दिसले असते, मात्र तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही.

अजित पवारांना (Ajit Pawar) विरोधी पक्षनेता करताना राष्ट्रवादीने काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली होती. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त आहे, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो, ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. मात्र इतरांचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न विरोधी पक्षनेता नेहमीच करतो, असे पाटील म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार पोहोचले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

दरम्यान, विधिमंडळाकडून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली गेल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 17 ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये (Mumbai) होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या