Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यास्विफ्ट-टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

स्विफ्ट-टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

बीड | Beed

येथील पाटोदा – मांजरसूंबा रोडवरील (Patoda – Manjarsumba Road) पाटोद्याजवळील बामदळे (Bamdale) वस्ती येथे आज सकाळी स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात (Accident) झाला आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कुटे नामक एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार झाले आहेत. पुणे (Pune) येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातील (CageTaluka) जीवाचीवाडी (Jeevachiwadi) येथे जात असताना हा अपघात झाला.

या अपघातात टेम्पो थेट कारच्यावर चढल्याने कार पुर्णपणे दाबली गेली. हा अपघात एवढा भीषण होता, की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमध्ये बसलेल्या कुटे कुंटुंबियातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पाटोदा पोलीस (Patoda Police) आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी (social workers) दाखल होत अपघातातील मृतदेह बाहेर काढले. तसेच अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या