Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधन (Passes Away) झाले. मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीड जिल्ह्यातील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली आहे…

- Advertisement -

आज संध्याकाळपर्यंत विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पार्थीव बीड येथे त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येईल. दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

याआधी आज विनायक मेटे यांचे पार्थीव मुंबईतील त्यांच्या वडाळ्यातील भक्तीपार्क येथील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.

मेटेंच्या अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; काय घडलं शेवटच्या एक तासात?

मुंबईतील (Mumbai) त्यांच्या राहत्या घरी शिवसंग्रामचे कार्यकर्ते तसेच अन्य नेते जमत आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या