Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याखोटी आश्वासने देत भाजपकडून लोकांची फसवणूक : नाना पटोले

खोटी आश्वासने देत भाजपकडून लोकांची फसवणूक : नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

देशातील महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र होऊन तिरंगा (Tiranga) डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत आहेत, अशा दुरंग्यापासून सावध रहा आणि तिरंग्याचा मान, सन्मान कायम राखा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले…

- Advertisement -

टिळक भवन (Tilak Bhavan) या काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना पटोले यांनी भाजपवर (BJP) नाव न घेता टीका केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जगातील इतर देशही स्वतंत्र झाले .पण त्यांचे स्वातंत्र्य फारकाळ टिकले नाही कारण त्या देशामध्ये लोकशाही आणि संविधान नव्हते, असे पटोले म्हणाले.

आपल्याकडे लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार होता म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.

देशाचे विभाजन होऊ नये हा काँग्रेसचा (Congress) विचार होता. पण विभाजनासाठी कोण कारणीभूत होते हे सर्वांना माहित आहे. ज्यांना तिरंगा मान्य नव्हता तेच लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवत आहेत, हा काँग्रेस विचाराचा विजय आहे, असा टोला त्यांनी लगावला.

तिरंग्याचा मान सन्मान राखला पाहिजे परंतु या इव्हेंटबाजीत तो राखला जात नाही. चीनमधून तिरंगा झेंडे आयात करण्यात आले आहेत, या तिरंग्यात रंग, आकार, अशोक चक्र याचा ताळमेळ लागत नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांना घर देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nare) यांनी दिले होते.

आज अमृत महोत्सव साजरा करत असताना किती लोकांना घरे दिली हे पाहिले तर हा सुद्धा एक जुमलाच निघाल्याचे दिसत आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या