Tuesday, May 7, 2024
Homeनगरबिरेवाडीत बिबट्याचा बोकडावर हल्ला

बिरेवाडीत बिबट्याचा बोकडावर हल्ला

साकुर |वार्ताहर| Sakur

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील बिरेवाडी (Berewadi) येथे बिबट्याने (Leopard) बोकडावर हल्ला (Buck Attack) करत त्याला ठार (Death) केले आहे. ही घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

बिबट्यांचा (Leopard) साकुर (Sakur) परिसरात मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे. बिबटे पाळीव प्राण्यांचा हल्ला (Attack) करत आहे. दोन दिवसा पुर्वीच साकूर जवळील बिरेवाडी (Birewadi) येथे सागर मळ्यात सयाजी पांडूरंग सागर हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी नेत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात बिबट्याने (Leopard Attack) एक बोकड घेवून धूम ठोकली.

बिरेवाडी, शिंदोडी, कौठेमलकापुर हिवरगावपठार, शेंडेवाडी, जांबुत, जांभूळवाडी, चिंचेवाडी, हिरेवाडी, शेंडेवाडी, मांडवे बु, दरेवाडी आदी गावात बिबट्याने हल्ले करून शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आणले आहे. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाच्या वतीने बिबट्यांना जेर बंद करण्यासाठी पिंजरे लावले जातात त्यात एखादा बिबट्या जेर बंद केला जातो बाकी बिबटे मात्र मोकळेच राहातात. यासाठी वनविभागाने पिंजरे संख्या वाढवून पिंजरे लावले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

साकूर पठार भाग हा डोंगराळ भाग असल्याने दरी, आढे, नाले, झाडी असा प्रदेश असल्याने बिबट्यांना वास्तव्य करण्यासाठी याचा फायदा होत असून या भागात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ वर्ग आहे. शेतीला जोड धंदा म्हणून दुध धंदा करणारे शेतकरी गायी, म्हशी, शेळ्या पाळतात. रानात वस्ती करून राहणार्‍या शेतकर्‍यांकडे पाळीव प्राण्यांबरोबर कुत्रे पाळण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. हीच जनावरे बिबट्यांचे भक्ष बनू लागली आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरे लावावे, अशी मागणी पठार भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या