Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमतदाराने थेट ईव्हीएम मशीन दिले पेटवून; 'हे' कारण आलं समोर

मतदाराने थेट ईव्हीएम मशीन दिले पेटवून; ‘हे’ कारण आलं समोर

सोलापुर | Solapur
देशात लोकसभा निवडणुकांसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान पार पडले आहे. राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यातच सोलापुर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे मतदानाची प्रक्रिया पार पडली जात असताना एका मतदाराने ईव्हीएम मशीनच पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रवार दादासाहेब चळेकर नामक मतदार हे मतदानासाठी आले असता ईव्हीएम मशीन पेटवले. मशीन पुर्णपणे पेटल्यामुळे त्याचे नुकसान झालं असून येथे फेरमतदान केले जाणार आहे. या मतदाराने ईव्हीएम मशीन का जाळले याचे कारण समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या कारणावरून त्याने ईव्हीएम जाळल्याचे सांगितले जात आहे. येथे १३०० मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार होते. साधारण ५० ते ६० टक्के मतदान झाले होते. मात्र हा प्रकार घडल्याने येथे फेरमतदान घेतले जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी; नेमकी काय चर्चा झाली?

मतदान करण्यासाठी येताना दादासाहेब तळेकर याने एका छोट्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ भरुन आणले होते. या पदार्थाची छोटी बाटली त्याने आपल्या खिश्यात लपवून आणली होती. दादासाहेब चळेकर याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकले आणि मशीनला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाल्याने तेथे नवीन मशीन आणून फेरमतदान केले जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सांगितल्यानुसार मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा दावा केलाय. नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हाने सुरू करण्यात आलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या