Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याJharkhand Political Crisis : हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

Jharkhand Political Crisis : हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

दिल्ली | Delhi

झारखंडच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठा भूकंप येण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकीच धोक्यात आली होती. यामुळे सोरेन यांनी आपले आणि मित्रपक्षाच्या आमदारांना छत्तीसगढला नेऊन ठेवले होते.

- Advertisement -

या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. सरकारच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही.

विश्वासदर्क ठरावापूर्वी करण्यात आलेल्या सभागृहातील भाषणात सोरेन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. या राज्यातील जनता जागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला धमकावून चालणार नाही. देशाचे पंतप्रधानच जर देशातील राज्यांसोबर भांडत असतील तर, देशाचा विकास कसा होणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या