Friday, May 3, 2024
HomeजळगावPhotos # जळगावात फुलांच्या उधळणीत गणेश मिरवणूंका

Photos # जळगावात फुलांच्या उधळणीत गणेश मिरवणूंका

जळगाव : jalgaon

शहरात गणेश विसर्जन मिरवणूकांनी (Ganesh Visarjan) चांगलाच जोर () धरला असून गणेश मंडळांकडून (Ganesha Mandalas) विविध देखावे सादर (Various scenes are presented) करण्यात येत आहे. राज्यभरात गुलालाच्या उधळणीत (Gulala’s across the state) मिरवणूका सुरू असल्या तरी जळगावात मात्र एकाही गणेश मंडळाने (Ganesha Mandal) चिमुटभरही गुलाल उधळला (Gulal did not spill even a pinch.) नाही. मिरवणूकीतील सहभागी भक्तांवर व कार्यर्त्यांवर फुलांच्या पाकळ्यांचा (Flowers on devotees and workers) वर्षाव करण्यात येत आहे.

- Advertisement -

लेझीम,मल्लखांब, दांडपट्टा यासारखे खेळ दाखवले जात आहेत. शिस्तबध्द मिरवणूक, विलोभणीय गणेश मुर्त्या,सजीव देखावे आणि जनप्रबोधनपर देण्यात येणारे संदेश यामुळे या मिरवूणका लक्षवेधी ठरत आहेत.

गुलाल मुक्त मिरवणूका

जळगाव शहरात दरवर्षी मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जात असे. गुलालामुळे होणारे दुष्परीणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका आणि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गुलाल मुक्त मिरवणूका काढण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेल्या सहा वषापासून गणेश विसर्जन मिरवणूकीत कोठेही गुलाल उधळला जात नाही. त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या फेकल्या जातात.

नारळांचा तुटवडा

गणेश विसर्जनानिमित्ताने विविध महिला बचत गटांसह घरगुती महिलांकडून उकडीचे, तळणाचे,तांदळाचे मोदक तयार केले जातात. या मोदकांसाठी ओले नारळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मोदकांच्या घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी महिला बचत गटांनी व घरगुती महिलांनी बाजारातून नारळांची खरेदी केली.नारळांची मागणी वाढल्याने दुकानादारांकडे जेवढे नारळ होते ते सर्व विकले गेलेत.

मोदकांच्या पेढ्यांच्या मागणी

दरम्यान स्वीट मार्ट कडे मोदकांच्या पेढ्यांना मोठी मागणी होती. साधे मोदक, माव्याचे मोदक, पान फ्लेवर मोदक, पेढ्यांचे मोदक यासारख्या विविध चवींच्या मोदकांना मोठी मागणी होती.

देशदूतच्या गणेशाचे विसर्जन

दरम्यान देशदूतच्या एमआयडीसी कार्यालयातील गणेशाचेही विसर्जन मोठ्या उस्तसाहात करण्यात आले. यात भटू पाटील, रामदास कांबळे,गजानन पाटील,सिध्दोधन पनाड, श्री. शिरसाठ, दिपक पाटील, वासू बाविस्कर व इतर यांनी सहभाग घेतला.

निर्माल्य संकलन, जीवरक्षक पथक सज्ज

जळगाव मनपा प्रशासनातर्फे निर्माल्य संकलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटनांनी देखील निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. मनपा अग्निशमन विभागाचे जीवरक्षक दल मेहरून तलाव येथे तैनात आहेत. त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या ़संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मेहरून तलाव येथे जीवरक्षक बोटीसह २० जीवरक्षकांचे पथक सकाळी ९ वाजेपासून तैनात झाले आहे. या पथकात पट्टीच्या पोहणार्‍या प्रशिक्षित जीवरक्षकांसह विसर्जनस्थळी १० सर्पमित्र, प्रथमोपचार तज्ज्ञ आणि निर्माल्य संकलनासाठी ३० स्वयंसेवक असे एकूण ६० कार्यकर्ते सेवा देत आहेत.

ड्रोन व्दारे नजर

मिरवणूकीवर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरात होणार्‍या घटनांवर नजर ठेवत आहेत..

काव्यरत्नावली चौकात मूर्ती संकलन

काव्यरत्नावली चौक येथे सकाळी ७ ते सायं. ७ वाजेदरम्यान युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. विसर्जनासाठी आलेल्या लहान मुत्यार्ंचे संकलन येथे करण्यात येत आहे. त्यामुळे मेहरून तलावावर गर्दी कमी प्रमाणात दिसून येत आहे. घरगुती श्रींच्या मुर्त्या सकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जित करण्यात येणार आहेत.

मु.जे.च्या मुलींच्या वसतीगृहाच्या राजाचे विसर्जन

दरम्यान मु.जे. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाच्या राजा गणेशाचे मोठ्या उत्साहात मिरवणूकीव्दारे विसर्जन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या