Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक

उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक

मुंबई | Mumbai

शिवसेनेचा (shivsena) बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये (Dadar) शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) आणि शिवसैनिकांनी मध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशसमोर (Dadar Police Station) ठिय्या आंदोलन केल्यानंतर या पाच शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली…

- Advertisement -

जामीन मिळालेल्या या पाच शिवसैनिकांना सोबत घेऊन विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant)हे मातोश्रीवर गेले (Matoshree)आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला भिडणाऱ्या या शिवसैनिकांची पाठ थोपटत कौतुक केले.

दादरमध्ये एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि शिवसेना यांच्यात शनिवारी रात्री राडा झाला होता. या राड्यात आमदार सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. यावेळी दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर आज शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दादर पोलीस स्टेशसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात अनिल परब (Anil Parab) अरविंद सावंत (Arvind Sawant) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादरमधील शिवसैनिकांना मातोश्रीवर बोलावले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच आदित्य ठाकरे यांनी महेश सावंत आणि इतर ५ शिवसैनिकांचे कौतुक केले. याप्रसंगी विभागप्रमुख महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसवण्यात आले. तर आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainiks) बसले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या