Friday, May 3, 2024
Homeनगरनुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी- परजणे

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी- परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे (Kharif Crops) व फळबागांचे (Orchard) मोठ्या प्रमाणावर नुकसान (Loss) झाले असून अनेक गावामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे (Loss) शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे (Rajesh Parjane) यांनी केली.

- Advertisement -

गडकरींना तनपुरेंनी दिले भोजनाचे आमंत्रण!

श्री. परजणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात वादळी वार्‍यासह (Stormy Winds) आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील पिके भूईसपाट झाली असून शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नैसर्गिक हानीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.

खड्ड्यात डांबर दाखवा 10000 रुपये मिळवा!

तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच बुद्रुक, घारी, जेऊरकुंभारी या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. डाऊच येथे वीज पडून जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. तालुक्यात पूर्व भागातही पावसामुळे शेतातील सोयाबीन, मका, कपाशी, भईमूग, बाजरी, तूर, उडीद, मूग, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह उसाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडी, पत्र्याची व मातीची घरे, झोपड्या जमिनदोस्त झालेल्या आहेत. काही ठिकाणचे शेतबंधारे फुटल्याने पिकांत पाणी शिरुन पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने दैनंदिन दळणवळणावर विपरीत परिणाम झालेला आहे. पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गुरूजींच्या जिल्हातंर्गत बदल्या लांबणार

अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या आहेत. शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करुनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबतच्या सूचना देवून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशीही मागणी श्री. परजणे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या