Friday, May 3, 2024
Homeनगरचिलेखनवाडी सोसायटीच्या ४ संचालकांसह ४९ सभासदांचे सभासदत्व रद्द

चिलेखनवाडी सोसायटीच्या ४ संचालकांसह ४९ सभासदांचे सभासदत्व रद्द

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील चिलेखनवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ४९ सभासदांचे सभासदत्व रद्द करून सभासद यादीतून अपात्र सभासदांची नावे वगळण्याचे आदेश नेवासा सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, चिलेखनवाडी सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर झाली असता संबंधीतांनी घाईने पात्रता धारण न करणाऱ्या ४९ सभासदांना सभासदत्व दिले. दि १६ एप्रिल २०२२ रोजी संस्थेची निवडणूक झाली निवडणूकीत ४ अपात्र सभासदही निवडून आले. चिलेखनवाडी येथील लोकनियुक्त सरपंच प्रा.भाऊसाहेब सावंत, देविदास सावंत, उपसरपंच नाथा गुंजाळ यांनी दिनांक २५ मे २०२ २ रोजी ४९ सभासदाविरुद्ध उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात संबंधीत सभासद दहा गुंठे क्षेत्र धारण करत नसल्याने संस्था अधिनियमातील कलम २५ नुसार त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी साहाय्यक निबंधक यांचेकडे पुराव्यासह केली होती.

त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयाने अर्जदार, गैरअर्जदार आणि संस्था सचिव यांना नोटीसा देऊन सुनावणी ठेवली होती. परंतु संबंधित गैरअर्जदार यांनी वकीलामार्फत अपिल करून पुरावे सादर करण्यासाठी मुदत मागितली. सदर मुदत सहाय्यक निबंधक यांनी देऊनही संबंधीत सभासदांना पुरावे सादर करता आले नाहीत. संबंधितांचे युक्तिवाद ऐकून तसेच कामगार तलाठी यांचे संस्थेचे सभासद व क्षेत्राबाबत दिलेल्या माहितीची सहाय्यक निबंधक यांनी पडताळणी करून उपविधीनुसार त्यांना अपात्र ठरवून त्यांची नावे संस्थेच्या सभासद नोंदवहीतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये चार विद्यमान संचालकांचा ही सामावेश आहे. निवडणूक होऊन पाच महिने उलटूनही सत्ताधार्यांना कामकाज सुरु करता न आल्याने शेतकऱ्यांची कुठलीही कर्ज प्रकरणे झाली नाहीत. सोसायटीच्या अनेक लाभांपासून शेतकरी वंचित राहिल्याने अकार्यक्षम संचालक मंडळा विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जमीन धारण नकरणाऱ्या बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द झाल्याने पात्र सभासदांनी आनंद व्यक्त केला.

सभासदत्व रद्द झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे

धोत्रे विठ्ठल लक्ष्मण, पवार पांडुरंग तुकाराम, लोखंडे शोभा जगन्नाथ, सावंत लताबाई दिंगबर (सर्व विद्यमान संचालक), गुंजाळ जगन्नाथ नागुजी, कुसळकर जनाबाई विठठल, कुसळकर सुरेश विठ्ठल, लिपणे आसाराम कुंडलिक, लिपणे गयाबाई आसाराम, लोखंडे जगन्नाथ शाहु, लवांडे भिमराज किसन, भातंबरे भिमबाई रामा, भातंबरे रामलिंग महादु, भातंबरे नंदा रामभाऊ, चव्हाण सुंदराबाई नारायण, धनवटे हिराबाई शिवाजी, धनवटे शिवाजी रामभाऊ, धोत्रे लिलाबाई जगन्नाथ, धोत्रे शालन विठ्ठल, डोईफोडे तुळसाबाई आबा, गवांदे मिराबाई पांडुरंग, गवांदे सुभद्रा दामोधर, गवांदे पांडुरंग दामोधर, गायकवाड कडुबाळ किसन, गुंजाळ सखूबाई भानुदास, गुंजाळ सिंधुबाई भगवान, जाधव लीलाबाई मारुती, जगधने बेबी रावणराव, धोत्रे जगन्नाथ म्हसू, खंडागळे पदमाबाई तुकाराम, खानोरे लताबाई जालिंदर, खानोरे शशिकला मच्छिंद्र, लोखंडे वत्सला माणिक, पंडित अमोल नवनाथ, पवार मिना पांडुरंग, पवार लताबाई विठ्ठल, पवार सुनिता सुभाष, पवार नवनाथ शंकर, पिटेकर रामलाल देवराव, सावंत रामभाऊ गुजाबा, सावंत वारुबाई रंभाजी, वेताळ सिताराम सखाराम, वेताळ बायजाबाई रामभाऊ, भातांबरे रामभाऊ धोंडीबा, गुंजाळ राधाबाई गंगाधर, गुंजाळ सावित्रीबाई चिमा, कांबळे चंद्रकला रावसाहेब, काळे लताबाई ज्ञानदेव व काळे बबनबाई आण्णा.

- Advertisment -

ताज्या बातम्या