तिसगाव |वार्ताहर| Tisgav
तिसगाव येथे बेकायदेशीर खरेदी खताच्या आधारे दहशत निर्माण करून दमबाजी करणार्या बिल्डरच्या विरोधात एका शेतकर्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
तिसगाव येथील शेतकरी भास्कर देशमुख यांनी या बिल्डरच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग लगत देशमुख यांची स्व मालकीची वहिवाटीची जमीन असून त्यांच्या शेजारी दक्षिण दिशेला असलेल्या तिसगाव-निवडूंगे या रस्त्याच्या पलीकडे संबंधित बिल्डरची जमीन असून त्याचा व माझा जमिनी संदर्भात दुरांन्वये संबंध नाही.
तरीही संबंधित बिल्डर वेगवेगळ्या कारणाने आडदांड व्यक्तींना हाताशी धरून दहशत निर्माण करून दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यापासून माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे निवेदन देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.