Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात साकारले जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर

नाशिक जिल्ह्यात साकारले जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant )येथील अमी जीवदया संस्थेद्वारे ( Ami Jivdaya )जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर (Bird feeder) तयार कऱण्यात आले आहे. 1543 पाऊंड (700 किलो) धान्य बसेल इतके अजस्त्र बर्ड फीडर असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे.

- Advertisement -

वाढते शहर व वाढते प्रदुषण यामुळे चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे, त्यांचा किलबिलाट वाढावा, त्यांना खाण्यासाठी धान्य मिळावे या हेतूने हे बर्ड फीडर बनविण्यात आले आहे. या विश्वविक्रमाद्वारे जगभरात हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

अमी जीवदया संस्था 2009 पासून पशुसंवर्धनासाठी काम करीत आहे. या अगोदर हा विक्रम अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया येथील विल्यम डान ग्रीने या रिटायर्ड शिक्षकाने 760 पाऊंड (345 किलो) धान्य बसेल एवढे मोठे बर्ड फीडर बनविले होते, त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रिकार्डस मध्ये होती. तो रिकार्ड मोडुन आता 1543 पाऊंड (700 किलो) चे बर्ड फीडरची नोंद झालेली आहे.

अमी जीवदया संस्थेचे अध्यक्ष पिंपळगाव येथील हरीश हिरालाल शाह यांनी सांगितले की, एवढे मोठे बर्ड फीडर बनविणे हे आमच्या कुवतीच्या बाहेर होते, परंतु अनेक लोकांच्या सहकार्यांने ते झाले.यामध्ये आर्किटेक्ट म्हणून योगेश वाघचौरे (नाशिक) यांनी डिझाईन करुन दिली ज्यामध्ये 75 किलो धान्य बसत होते.नंतर त्यामध्ये सुधारणा करुन या स्वरुपात बनविण्याचे ठरले.

अंबड येथील दिलीप कोचचे मालक दिलीप व नागेश पिंगळे यांनी फेब्रिकेशन करुन याला स्वरुप दिले. नाशिक येथील शुभम महाडिक यांनी यावर सुंदर अशी पेटिंग केली. मनोज सोनी, शफिक शेख (पिंपळगांव) यांनी साक्षीदाराची भूमिका निभावली. स्मित शाह, अनिल माळी, संदीप बैरागी, प्रणव भोपाळे (कोल्हापूर), शामलाल मिस्तरी, संजय आहेर(पोलिस), अमन शाह, तनवीर काझी यासह माझ्या परिवारातील सर्वांनी मला या कार्यासाठी मदत केली. या बर्ड फीडरचे सर्व माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस संस्थेला पाठविली व त्यांनी 30 आँगस्ट 2022 ला माझ्या बर्ड फीडरची नोंद जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर म्हणून केली व त्याचे प्रमाणपत्र मला पाठविले,

सदर बर्ड फीडर हे रानमाळा, पिंपळगांव येथे बघण्यासाठी ठेवलेले आहे. या फीडरला 108 खिडक्या असून त्यामध्ये दिवसभरात हजारो पक्षी धान्य चुगण्यासाठी येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या