Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या“कितीही अफजल खान आले तरी…”; सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरेंचा भाजपावर...

“कितीही अफजल खान आले तरी…”; सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्यावर शिंदे गट विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावर दावा केला आहे. या सर्व प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्ला केला आहे.

- Advertisement -

मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील मातोश्री या आपल्या निवासस्थानी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यत्त केला.

उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे की, ‘आताचं जे वातावरण आहे ते भारावून टाकणारं आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफझल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. आई भवानीचा आशीर्वाद आपल्यावर आहेच, शिवाय कोण खरं कोण खोटं हे देखील दाखवून दिलं आहे,’ असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

तसेच, ‘सध्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. मला रोज अनेक फोन येत आहेत, कुठेही काही आपलं नुकसान झालेलं नाही. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या