Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यापाच वर्षांनंतर सप्तशृंगी गडावर 'ही' प्रथा पुन्हा होणार सुरु; उच्च न्यायालयाचा मोठा...

पाच वर्षांनंतर सप्तशृंगी गडावर ‘ही’ प्रथा पुन्हा होणार सुरु; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सप्तशृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा गेल्या पाच वर्षापासून बंद आहे. मात्र यंदा दसऱ्याला बोकड बळीची प्रथा अटीशर्तीसह पुन्हा सुरू होणार आहे…

- Advertisement -

बोकड बळीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने बोकड बळीची प्रथा अटीशर्तीसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

११ सप्टेंबर २०१६ रोजी दसऱ्याच्या दिवशी परंपरेनूसार बोकड बळीचा विधी सुरु होता. यावेळी न्यासाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मानवंदनाच्या गोळीबारात गोळीचे छरे उडून १२ भाविक जखमी झाले होते. या प्रथेमळे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सप्टेंबर २०१७ पासून बोकड बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या