Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर शहराचा देशात 28, राज्यात सहावा क्रमांक

नगर शहराचा देशात 28, राज्यात सहावा क्रमांक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहराने स्वच्छ सर्वेक्षणात (Ahmednagar City Clean Surveys) यशस्वी कामगिरी केली आहे. देशातील एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या 382 महापालिका (Municipal Corporation) व नगरपालिकांच्या (Municipality) गटात नगर शहराला 28 वा क्रमांक मिळाला आहे. तर राज्यात सहावा क्रमांक मिळाला आहे. केंद्र सरकारकडून (Central Government ) शनिवारी सायंकाळी रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी कचरा मुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार मानांकन (Three Star Rating) मिळाले आहे.

- Advertisement -

पालिकेचे पाणी जास्तच ढवळले…

स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेने ( Ahmednagar Municipal Corporation) मागील काही वर्षात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यावर्षीही महापालिकेने सर्वेक्षण काळात कचरा संकलन व वाहतूक, दैनंदिन साफसफाई, शौचालय सुविधा आदींवर चांगले काम केले होते. त्यातून नागरिकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. सर्वेक्षण काळात पथकाने केलेल्या तपासणीमध्ये कचरा मुक्त शहर म्हणून यापूर्वीच नगरला घोषित करण्यात आले आहे. त्यासाठी थ्री स्टार मानांकनही देण्यात आले आहे.

आ. जगताप यांनी पालकमंत्र्याकडे केली ‘ही’ मागणी

आता संपूर्ण सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला असून, यात नगर शहर व महापालिकेला देशात 28 वा तर राज्यात सहावा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये महापालिकेला 5335 मार्क मिळाले आहेत. यात ओडिएफ तपासणीमधील काही मार्कांचा समावेश झालेला नाही. त्याचा समावेश करण्याबाबत संपर्क साधण्यात आलेला आहे. या मार्कांचा समावेश झाल्यानंतर रँकिंग मध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास उपायुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.

आळेफाटा येथे डंपरची चोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या