Monday, May 6, 2024
Homeधुळेदोंडाईचातील रावल गढीवर शस्त्र व अश्व पूजन

दोंडाईचातील रावल गढीवर शस्त्र व अश्व पूजन

दोंडाईचा । Dondaicha

दोंडाईचा येथे माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या रावल संस्थानात येथे परंपरेनुसार यंदाही शाही दसरा साजरा केला झाला. यानिमित्ताने शस्त्र पूजन करून सीमोल्लंघन करण्याची परंपरा आज ही कायम राहिली.

- Advertisement -

सरकार साहेब रावल, माजी मंत्री जयकुमार रावल यांनी शस्त्रपूजन व अश्व पूजन केले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झालेत.

या सोहळ्याची सुरवात रावल गढी वरून सनई चौघडा व ढोल-तास्याच्या गजरात मशाल पेटवून शहरातील नागरिकांसह सीमोल्लंघन करून करण्यात आले. यानंतर रावल परिवारासह सर्वांनी मांडळ रोड येथील काश्मीर्‍या मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली व मंत्रोच्चारात शमी वृक्षाचे पूजन केले. तसेच दरम्यान, सीमोल्लंघनाच्या या मिरवणुकीत शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी श्री. रावल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मिरवणुकीवर नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली.

दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, ज्ञानाचा अज्ञानावर विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. 300 वर्षाहुन अधिकची परंपरा असलेल्या दोंडाईचा येथील रावल संस्थानच्या वतीने परंपरेनुसार दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शस्त्रपूजन, अश्वपूजन करण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या