Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवारांची दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अजित पवारांची दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

काल (दि.५) रोजी शिवसेनेच्या (Shivsena) राजकीय इतिहासात पहिल्यांदात दोन दसरा मेळावे झाले. यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मेळावा झाला.

- Advertisement -

या दोन्ही मेळाव्यांमधून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे…

ते म्हणाले की, मी काल टिव्हीवर दोघांचेही दसरा मेळावे (Dasara Melava) पहिले. दोन्ही मेळावे महाष्ट्राने पाहिले आहेत. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली, मी दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही पण आता लोकांनी कुणाच्या पाठीमागे उभे राहायचे हे जनतेने ठरवावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच कालच्या मेळाव्यात काहींना जेवायला मिळाले नाही, कुणाला नाष्टा, चहा मिळाला नाही. काहींना तर अनेक कार्यकर्त्यांना कशाला आणले हेच माहिती नव्हते. त्यामुळे जनतेने आता कुणाच्या पाठीशी उभे रहावे हे त्यांनी ठरवावे, कारण झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा (NCP) असे मी कधी ऐकले नाही. तर काल केलेली वक्तव्य हे राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व द्यायचे नसते असे देखील ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर शिवसैनिक शिवाजी पार्कात येत होते. आता पिढ्या बदलल्या असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत. पंरतु कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणे खूपच लांबली, आता कुणाची लांबली ते तुम्हाला देखील माहिती आहे अशी टीकाही अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या