Friday, May 3, 2024
Homeनगररवीराज पवार यांची मुख्यमंत्री वॉररुम मुख्य समन्वयकपदी नियुक्ती

रवीराज पवार यांची मुख्यमंत्री वॉररुम मुख्य समन्वयकपदी नियुक्ती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नगरचे भूमिपुत्र रवीराज पवार यांची नुकतीच मुख्यमंत्री वॉररूमच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

पवार यांना वॉररूम सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. मुख्यमंत्री वॉररूमचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष तर राधेशाम मोपलवार हे महासंचालक आहेत. अतिशय महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल पवार यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

पवार यांचे मूळ गाव नेवासा तालुक्यातील सोनई येथील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनई पब्लिक स्कूल येथे झाले. अभियांत्रिकी पदवी व्हीआयटी पुणे येथे घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूममध्ये 2018 पासून ते कार्यरत होते. या काळात त्यांनी अल्पावधीतच कामाचा ठसा उमटविल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर वॉररूमच्या मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

मुख्यमंत्री वॉररूममधून राज्यातील सर्व मोठ्या व महत्वाकांक्षी प्रकल्पांची देखरेख व सनियंत्रण होते. प्रकल्पांसमोरील अडथळे व अडचणी मुख्यमंत्री स्वत: वॉररूमच्या माध्यमातून सोडवितात. ग्रामीण भागातून सोनई ते मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमची जबाबदारी रवीराज पवार यांच्या खांद्यावर आली ही ग्रामीण भागातील तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. रवीराज पवार यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या