Friday, May 3, 2024
Homeनगरगंभीर आजाराचे कारण देत गुरूजींच्या सोयीनुसार बदल्या

गंभीर आजाराचे कारण देत गुरूजींच्या सोयीनुसार बदल्या

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील एका आदर्श शिक्षकाने गंभीर आजारी असल्याची खोटी कागदपत्र देऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आपल्या सोयीनुसार बदली करून घेतल्याचे समोर येत आहे. बाबत या आदर्श शिक्षकासह अशा इतर शिक्षकांची चौकशी करून खरोखरच त्यांना गंभीर आजार आहे का? याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

- Advertisement -

बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवणार्‍या बरोबरच गंभीर आजाराचे कारण पुढे करून आपल्या सोयीनुसार गावाजवळ बदल्या करणार्‍या शिक्षकांचे देखील रॅकेट पुढे येते असल्याची चर्चा आहे. या बनावट प्रकारामुळे खर्‍या गंभीर आजारी ( कॅन्सर , हृदयरोग , पक्षाघात आदी.) शिक्षकाच्या कोट्यातून हा लाभ पात्र नसताना घेतल्याने गंभीर आजारी शिक्षक यापासून वंचित राहत आहेत.

करंजी परिसरातील या आदर्श शिक्षकासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत सखोल चौकशी कारवाई करावी अशी मागणी लेखी पत्रकांद्वारे संदीप अकोलकर, छानराज क्षेत्रे यांनी विभागीय आयुक्त, इंडियन मेडिकल कौन्सिल, मुख्य सचिव ग्रामविकास लोकायुक्त यांचेकडे केली आहे. आरोग्य व शिक्षण विभागाने योग्य ती कारवाई केली नाही तर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा छानराज क्षेत्रे, संदीप अकोलकर यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या