Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानोटांवर कुणाचा फोटो असायला पाहिजे? अनिल परब म्हणाले...

नोटांवर कुणाचा फोटो असायला पाहिजे? अनिल परब म्हणाले…

मुंबई | Mumbai

गुजरात निवडणुकांच्या (Gujarat Elections) दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. तर दुसरीकडे भाजपा नेत्यांनीही आता विविध नाव घेत नोटांवर (Note) फोटो छापण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात भाजपचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी फोटो ट्विट केले असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. त्यात वि.दा. सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही (PM Narendra Modi) फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab)यांनी देखील नोटांवरील फोटोच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

ते म्हणाले की, नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने (shivsena) कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत. असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा (Currency Notes) आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे.तसेच भारतीय चलनी नोटांवर गांधीजींऐवजी देवी-देवतांच्या फोटोंपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोपर्यंत वाद येऊन पोहोचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या