Friday, May 3, 2024
Homeनगरनगर बाजार समितीत शेतमाल तारण योजना

नगर बाजार समितीत शेतमाल तारण योजना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2022-23 च्या खरीप हंगामाच्या आर्थिक वर्षासाठी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी स्वनिधीतून रक्कमेची तरतूद करण्यात आली असून शेतमाल तारण योजना राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

शेतमाल तारण योजनेत शेतकर्‍यांनी शेतमाल गोदामात ठेवल्यानंतर वखार महामंडळाकडून पावती घ्यावी. त्यावर पोत्यांची संख्या, मालाचे अंदाजे वजन प्रति क्विंटल दर या गोष्टी नमूद करण्यात येणार आहे. तसेच तारण कर्जासाठी अर्ज, शंभर रुपयांचा मुद्रांक पेपरवर करारनामा, 7/12 उतारा, पीक पेरा, बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे बाजार समितीकडे जमा केल्यानंतर शेतमालाच्या प्रतवारीनुसार प्रचलित दराच्या एकूण किंमतीच्या किंवा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव यापैकी जो भाव कमी असेल त्यावर तारण कर्ज धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार आहे.

या कर्ज रक्कमेची व्याजासह 6 महिन्यांत परतफेड करून तारण माल ताब्यात न घेतल्यास या शेतमालाची बाजार समितीतर्फे विक्री केली जाणार आहे. या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतकन्यांनी लाभा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक के. आर. रत्नाळे, सचिव अमय भिसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या