Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढता गरीब व भूमिहिन गायरान धारक आणि निवासी भोगवटार यांच्या वतीने शासनानेच जनहित याचिका दाखल करावी अशी मागणी करत श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अतिक्रमण धारकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्यात आल्या,

- Advertisement -

आज सकाळी लोकाधिकार आंदोलन संघटनेचे अध्यक्ष अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा झाला. या आक्रोश मोर्चात जिल्हा समन्वयक संतोष भोसले, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, संतोष चव्हाण, लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, प्रा. बळे सर, ज्योती भोसले, शिवाजी पोटे, राहुल साळवे, वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष संतोष जठार, तालुकाध्यक्ष संतोष जौंजल, यांनी मनोगत व्यक्त केली तर आनंदा पवार, संतोष पवार, प्रेरणा धेंडे, आसाराम काळे, विलास काळे, शरद काळे, पल्लवी शेलार, छाया भोसले, मदने उज्वला, जलिंदर शिंदे, बनकर सुनीता, लता सावंत, नरसिंग भोसले, सुरेश काळे, किसन बर्डे, भाऊ क्षीरसागर, थोरात मामा, सुभाष बर्डे, ससाणे अक्षय, मयूर भोसले, राजेंद्र राऊत बापूसाहेब, प्रमोद काळे, अण्णासाहेब कोळपे, ओहोळ, पिंटू भोसले, नवनाथ शिंदे, राजू मंडले, प्रसाद भिवसने आदी सहभागी झाले होते. या सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी केले तर आभार संतोष भोसले यांनी मानले

- Advertisment -

ताज्या बातम्या