Thursday, May 2, 2024
Homeनगरराहुरीच्या घोरपडे हॉस्पिटलमध्ये चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरीच्या घोरपडे हॉस्पिटलमध्ये चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहर हद्दीतील घोरपडे हॉस्पिटलमधून 40 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आणि काही वेळातच घोरपडे यांच्या खात्यातून अज्ञात भामट्याने 20 हजार रुपये काढून घेतले. अशाप्रकारे एकूण 60 हजार रुपयांची चोरीची घटना दि. 18 नोव्हेंबर रोजी घडली आहे. डॉ. कैलास नामदेव घोरपडे यांचे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात डॉ. घोरपडे अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटल आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर ते राहत आहेत.दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान डॉ. घोरपडे दवाखान्यातील काम आटोपून कॅबिनचा दरवाजा ओढून घेऊन वरच्या मजल्यावरील घरात गेले. त्यानंतर अज्ञात भामट्याने कॅबिनमधील ड्रावरचे कुलूप तोडून ड्रावर मधील 40 हजार रुपयांची रोख रक्कम व एटीएम कार्ड तसेच पाकिट चोरून नेले.त्यानंतर काही वेळातच देवळाली येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून 20 हजार रुपये काढल्याचा एसएमएस डॉ. घोरपडे यांना आला.

अशी एकूण 60 हजार रुपयांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कैलास नामदेव घोरपडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 1186/2022 भादंवि कलम 380, 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आजिनाथ पालवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या