Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला 'हा' इशारा

राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

मुंबई | Mumbai

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील जत तालुक्यासह (Jat Taluka) सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितल्याने राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे…

- Advertisement -

राऊत म्हणाले की, मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. समजा, महाराष्ट्राकडे (Maharashtra)वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलिंडरवर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी शिवसेना (Shivsena) स्वाभिमानाने या महाराष्ट्रात उभी आहे हे विसरू नका, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर सरकार अस्तिवात आल्यामुळे आणि सरकारचे प्रमुख तंत्रमंत्र आणि जोतिष्य यामध्ये अडकल्याने कर्नाटक आणि गुजरातमधून (Gujrat) महाराष्ट्रावर असे हल्ले होत आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठामपणे भूमिका घेऊन उभे नाहीयेत. फक्त एकही गाव जाणार नाही असे बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावे, तालुके पळवायचे. महाराष्ट्र सह्याद्रीच्या नकाशावरुन संपवून टाकायचा असे काही संगनमत आहे का?, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या