मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (दि.२३) रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील (Sinner) ईशान्येश्वर मंदिराला (Ishanyeshwar Temple) भेट दिली. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाकडून आपले आणि राज्याचे भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे…
मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; ‘इतक्या’ दुचाकी जप्त
यावेळी पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी (Astrologer) नाही. माझा ज्योतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही. आसाममध्ये (Assam) गेले आता परत जात आहेत. तसेच स्वत: बद्दल आत्मविश्वास नसला, की ज्योतिषाकडे जावं लागतं, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.
पुढे ते म्हणाले की, सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला (Shirdi)जाणं आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणं या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचं राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra)या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही पवारांनी सांगितले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा नवा दावा; म्हणाले, सोलापूर आणि अक्कलकोट…